अंतरिम निकाल जिल्ह्यानुसार अपलोड होत आहे. साधारणपणे 31/03/2026 पर्यंत सर्व जिल्ह्यांचे निकाल अपलोड होतील. जिल्ह्यांचे निकाल अपलोड होत असताना आपल्याला संकेतस्थळावर कोणत्या दिवशी कोणत्या जिल्ह्याचा निकाल अपलोड होणार आहे याची माहिती मिळेल, त्यानुसार आपण आपला निकाल तपासावा.
गुण पडताळणी / Recheck
गुणपडताळणी/ रिचेक करण्यासाठी आपणास परीक्षेच्या वेळी उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी दिलेली आहे तसेच ह्या निकाला बरोबर विद्यार्थ्यांनी सोडवलेली उत्तरपत्रिका ही या निकालाच्या खालोखाल आपण अपलोड केलेली आहे.
निकालाबाबत काही हरकत असल्यास, कार्बन कॉपी किंवा अपलोड केलेल्या उत्तरपत्रिकेची प्रिंट काढा. अंतिम उत्तरसूचीशी उत्तरांची पडताळणी करून, योग्य किंवा अयोग्य चिन्हांकित करा. त्यानंतरच रिचेकची मागणी 09130093830 व्हॉट्सॲप नंबरवर पाठवा.
निकालाबाबत शंका किंवा गुणपडताळणी साठी कार्बन कॉपी किंवा ऑनलाईन अपलोड केलेली उत्तर पत्रिका तपासलेली असावी. फक्त विद्यार्थ्यांच्या माहिती पाठवल्यास अशा मागणीचा पुन:र्गुणपडताळणीसाठी विचार केला जाणार नाही.
गुणपडताळणी/ रिचेकची मुदत संबंधित जिल्ह्याच्या अंतरिम निकाल अपलोड केल्यानंतर तीन दिवस वैध राहील तदनंतर आलेल्या मागणीचा/ अर्जाचा विचार केला जाणार नाही.
अंतिम गुणवत्ता यादी अंदाजित दिनांक 06/04/2026 रोजी जाहीर केली जाईल.
राज्यस्तरीय गुणवत्ता यादी
जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी
केंद्रस्तरीय गुणवत्ता यादी क्रमशः अपलोड होतील. अंदाजीत दिनांक 07/04/2026 ते 12/04/2026 पर्यंत सर्व गुणवत्ता याद्या जाहीर होतील.
अभिप्राय
आपला आमच्या परीक्षाप्रणाली बाबतचा (अभ्यासक्रम, परीक्षा आयोजन, निकाल, तंत्रज्ञान इत्यादी) अभिप्राय आम्हाला आमच्या गुणवत्ता परीक्षण व सर्वांगीण सुधारणांसाठी खूप महत्त्वाचा आहे. कृपया आपला अभिप्राय द्यावा ही विनंती.